Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केरळ: ‘ई’ सिगारेटवर बंदी

Webdunia
तिरुवनंतपुरम्- आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणार्‍या ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’वर बंदी आणण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. ‘ई’ सिगारेट ओढल्याने अनेक आजार होतात, हे विविध अध्ययन आणि संशोधनानंतर सिद्ध झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. ई-सिगरेटमुळे कर्करोग आणि हृदयरोग होतो, असा निष्कर्ष या संदर्भात अभ्यास करणार्‍या आरोग्यविषयक संस्थांनी काढला आहे, हे विशेष. 
 
केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी गुरुवारी अतिरिक्त मुख्य सचिवांना (आरोग्य) आदेश देऊन इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादन, विक्री आणि जाहिरातीवर तत्काळ बंदी आणण्यास सांगितले. 
 
बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार्‍या ई सिगरेटमुळे लहान मुलांच्या आणि तरुणांच्या आरोग्यावर व भवितव्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहे, याकडे केरळमधील माध्यमांनी सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच धूम्रपानाच्या माध्यमातून गांजा, हशीश व अन्य मादक द्रव्य सेवनाचे प्रमाण वाढल्याचे राज्याच्या औषध नियंत्रण विभागाला आढळून आले होते. याची गांभीर्याने दखल घेऊन केरळ सरकारने ‘ई’ सिगरेटवर तत्काळ प्रभावाने बंदी आणण्याचा आदेश जारी केला आहे. ई-सिगरेट हाताळायला सहज असून याच्या माध्यमातून बाष्पीकृत निकोटीन ओढता येते.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

पुढील लेख
Show comments