Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खासदार जया बच्चनविरोधात गुन्हा दाखल

वार्ता
मंगळवार, 24 जून 2008 (19:05 IST)
ज्येष्ठ अभिनेत्री व समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्याविरोधात जून २००६ मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकात खरी माहिती दडविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य विधानसभा सचिवालयाचे प्रमुख आर. पी. पांडे यांनी हा गुन्हा दाखल केला. ते या पोटनिवडणुकीत निवडणूक अधिकारी होते. बाराबंकी जिल्ह्यात श्रीमती बच्चन यांचे पती अमिताभ यांच्या नावावर एक भूखंड होता. याविषयीची माहिती या प्रतिज्ञापत्रकात दिलेली नव्हती, असा ठपका ठेवून श्री. पांडे यांनी श्रीमती बच्चन यांच्याविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल केला.

बाराबंकी येथील अमीर हैदर यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने श्री. पांडे यांना निर्देश देऊन ही कारवाई करावी असे सांगितले होते.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments