Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाईच्या हत्येवरुन मैनपुरीत दंगल

Webdunia
शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (11:01 IST)
गाईची हत्या केल्याच्या संशयाने जमावाने चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना मैनपुरी येथे घडली. हिंसक जमावाने दुकान आणि वाहनांना आग लावल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका गाईचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर मालकानेच कातडे कमावण्यासाठी तिला चौघांकडे सोपवले होते. परंतु या चौघांनीच गाईची हत्या केल्याच्या संशायाने जमलेल्या जमावाने पोलीसांना बोलावून घेतले आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलीसांनी शहानिशा करण्याच्या हालचाली सुरु केल्या असतानाच जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी त्या चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हिंसक जमावाने दुकाने आणि वाहनांना आग लावल्याने परिस्थिती चिघळली. परिरिस्थती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलीसांनी अश्रुधुराचा वापर केला. मात्र, जमावाने पोलीसांनीही लक्ष्य बनविले. या हल्यात सात पोलीसांसह अनेक नागरीक जखमी झाले आहेत. पोलीसांनी २० जणांना अटक केली असून सुमारे ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

Show comments