Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुडगावची अदिती आर्या बनली मिस इंडिया 2015

Webdunia
सोमवार, 30 मार्च 2015 (13:17 IST)
गुड़गांवच्या निर्वाणा कंट्रीत राहणारी अदिती आर्याने 2015च्या फॅमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आहे. या किताबाला जिंकून तिने गुड़गावच नव्हे तर संपूर्ण हरियाणाचे नाव रोशन केले आहे. अदितीच्या मिस इंडिया झाल्यानंतर तिचे शेजारील फारच खूश आणि उत्साहित दिसले. अदिती आता मिस वर्ल्डसाठी कंपीट करेल.  
 
गुड़गांवात राहणारी अदिति आर्याच्या डोक्यावर फॅमिना मिस इंडियाचे ताज सजले आहे. मुंबईच्या यशराज स्टुडियोत झालेल्या या मिस इंडियाच्या फिनालेत बरेच राउंड झाले आणि बाजी मारली गुड़गांवच्या अदितीने. अदितीचे मिस इंडिया बनल्यानंतर गुड़गांवात तिजे शेजारी फारच उत्साहात दिसले. तिचे शेजारी राजेश बलवानचे म्हणणे आहे की अदिति शांत स्वभावाची मुलगी आहे आणि सर्वांमध्ये मिसळून राहते. त्यांच्या मुली अदिती आणि तिच्या बहिणीच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. 
  
राजेशची मोठी मुलगी चिनाबचे म्हणणे आहे की अदिति तिच्या शेजारी राहते आणि अदितीने हा किताब जिंकल्यामुळे त्यांना तिचा अभिमान वाटत आहे. अदितीची लहान बहीण दीया पाचवी वर्गात शिकत आहे.  
 
उशिरा रात्रीपर्यंत चालणार्‍या या इवेंटच्या ज्यूरीत मनीषा कोइराला, जॉन अब्राहम, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर सारख्या ख्यातमान व्यक्ती होते. फॅमिना मिस इंडियाच्या माध्यमाने फक्त सुंदरताच नव्हे तर संपूर्ण पर्सनॅलिटीला जज करण्यात येते कारण मिस वर्ल्ड कॉनटेस्टमध्ये मिस इंडिया भारताला रिप्रेजेंट करते.  

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments