Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुप्तचर यंत्रणा अपयशी, सीमा सुरक्षेत वाढ

Webdunia
मंगळवार, 28 जुलै 2015 (10:01 IST)
नवी दिल्ली- पंजाबमधील गुरुदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर तीव्र टीकास्त्र सोडले. कोलमडलेली सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे हा हल्ला झाल्याची टीका काँग्रेसने संसदेमध्ये जोरदार विरोध व्यक्त करताना केली.
 
दहशतवादी हे सीमारेषेपलीकडून आले, असे म्हटले जात आहे. हे जर खरे असेल; तर कोलमडलेली सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळेच हा हल्ला झाला आहे. अशा शक्तींचा बीमोड करण्यासाठी भारताने सशक्त कारवाई करणे आवश्यक आहे. 
 
यासंदर्भात पंतप्रधानांनी ठाम पावले उचलणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामध्ये उफा येथे झालेल्या चर्चेबद्दल मोदी यांनी मौन बाळगले आहे. आता दहशतवादी हल्ला घडला आहे व त्यांनी अद्याप मौन धारण केले आहे, असा तीव्र हल्ला काँग्रेसचे संसदेमधील नेते आनंद शर्मा यांनी सरकारवर चढविला. दरम्यान, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस व इतर पक्षांनी या प्रकरणी राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

Show comments