Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोळ्या झाडून कलबुर्गींची हत्या

Webdunia
सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (11:23 IST)
धारवाड-  पुरोगामी विचारवंत आणि परखड वक्ते डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची कल्याणनगरातील निवासस्थानी अज्ञातांना गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. कलबुर्गी यांच्या घरी सकाळी मोटारसायकलवरून दोघे आले होते. त्यापैकी एकाने दरवाजा ठोठावल्यानतंर सौ. उमादेवी कलबुर्गी यांनी दार उघडले.
 
विद्यार्थी असल्याचे सांगून एकाने सरांना बाहेर बोलावण्याची विनंती केली. डॉ. कलबुर्गी दरवाजात आले असता दरवाज्यातील युवकाने गोळ्या झाडल्या.
 
कपाळात आणि छातीत गोळ्या घुसल्याने डॉ. कलबुर्गी कोसळले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना सर्वप्रथम खासगी रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉ. कलबर्गी यांच्यावर यापूर्वी हल्ला झाल्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या विनंतीवरून पोलिस संरक्षण काढण्यात आले होते. त्यानंतर हा हल्ला झाला.
 

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

Show comments