Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जयपूर स्फोटातील संशयिताचे रेखाचित्र जारी

भाषा
बुधवार, 14 मे 2008 (21:12 IST)
राजस्थान पोलिसांनी जयपूर बॉम्बस्फोट मालिकेततील संशयित पंचवीस वर्षीय युवकाचे रेखाचित्र जारी केले आहे. सायकल दुकानदाराने दिलेल्या वक्तव्यानुसार रेखाचित्र तयार करण्यात आल्याचे पोलिस संचालक पंकज सिंग यांनी सांगितले.

दहशतवाद्यांनी स्फोटकांच्या साहाय्याने स्फोट घडवून आणण्यासाठी येथून विकत घेतलेल्या सायकलचा उपयोग केला होता.सर्व महत्त्वाच्या ठिकाणी रेखाचित्र लावण्यात येईल, असे गृहमंत्री गुलाबचंद कटारीया यांनी सांगितले. बॉम्बस्फोट घडवून आणण्यात नऊ पेक्षा कमी किंवा जास्त दहशतवाद्यांच्या पथकांचा समावेश असू शकतो.

दहशतवाद्यांनी सायकल विकत घेतलेली दोन दुकाने ओळखण्यात आली आहे. स्फोटाच्या पंचेचाळीस‍ मिनिट अगोदर एका महिलेने नवीन सायकल विकत घेण्यास जाण्यासाठी आपणाकडे विचारणा केल्याचा दावा रिक्षावाल्याने केल्याने त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.

तो जखमी झाला असून रूग्णालयात उपचार घेत आहे. बॉम्बस्फोटाची सूत्रधार संघटना कोणती याबाबत अद्याप सांगणे शक्य नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

Show comments