Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जयललिता पुन्हा मुख्यमंत्रिपदी!

Webdunia
शनिवार, 23 मे 2015 (14:51 IST)
अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा ६७ वर्षीय जयललिता यांनी सकाळी मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत हेही उपस्थित होते. तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी मंत्रीमंडळातील २८ जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले.
 
बेहिशोबी बेहिशेबी संपत्तीप्रकरणी जयललिता यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे गेल्यावर्षी २९ सप्टेंबर रोजी पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने याप्रकरणी जयललितांना ११ मे रोजी निर्दोष ठरवले आणि त्यांचा पुन्हा एकदा तमिळनाडुच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.  

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

Show comments