Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवाद एक रावण आपण तो जळूया - पंतप्रधान

Webdunia
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016 (11:17 IST)
लखनऊच्या लक्ष्मणनगरीतील रामलीला विजयादशमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीं कार्यक्रामला उपस्थिती लावली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करुन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्याला सोडणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
 
सम्पूर्ण  जगात  दहशतवादाच्या राक्षस  नाश करण्यासाठी मानवतावादी शक्तींना एकत्रित होण्याची गरज आहे. दहशतवादाला नष्ट करण्यासाठी, त्याला खतपाणी घालणाऱ्याचाही नाश केला पाहिजे, अशी टीका त्यांनी पाकिस्तानचं नाव न घेता केली आहे.
 
अनेक निरपराध्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.   मानवतावादाचा दहशतवाद सर्वात मोठा शत्रू बनला आहे. दहशतवादी मानवतावाद्यांना नष्ट करत आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
 दहशतवादाविरोधातली पहिली लढाई जटायूने लढली. एका स्त्रीच्या रक्षणासाठी जटायू रावणासोबत युद्ध केलं आहे . तेव्हा दहशतवादाविरोधात लढताना आपल्याला प्रभू श्रीराम होणे जमलं नाही, तरी जटायूची भूमिका आपण नक्की साकारु शकतो. रभू श्रीराम मानवतवादाचं प्रतिनिधित्व करताता. तर रावण दहशतवादाचं प्रतिनिधित्व करतो. तर आज आपण देश म्हणून एकत्र उभे रहिले पाहिजे आणि या विरोधात लढले पाहिजे असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments