Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देश मजबूत हातांमध्ये सुरक्षित : अमित शहा

Webdunia
पुणे- पुण्यात भाजपच्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी आलेले भाजपचे राष्ट्री अध्यक्ष अमित शहा यांनी एकनाथ खडसे यांच्याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. अमित शहा यांनी एकनाथ खडसे यांच्या विषयावर काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, आपल्या संपूर्ण भाषणात अमित शहा यांनी खडसेंबाबत कोणताच उल्लेख न करता सूचक मौन बाळगले.
 
बालगंधर्व नाटय़गृहात भाजपने कौशल्य विकास मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अमित शहा आले होते. यावेळी अमित शहा म्हणाले की, तीस वर्षानंतर जनतेने भाजपला पूर्ण बहुमत देऊन सत्तेत आणले आहे. देशाच्या भवितव्यासाठी तरूणांच्या हाताला रोजगार द्यायला हावा. त्यासाठी कौशल्यावर आधारित रोजगाराची निर्मिती व्हायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्कील इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना आणि मेक इन इंडिया या योजना आणल्या आहेत. कौशल्य विकास हे ‘मेक इन इंडिया’ला जोडल्याने अनेक युवकांना व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. चुकीचे सरकार व नीतीमुळे युवकांचा विकास झाला नाही.

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख
Show comments