Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नववर्षात बिहारमध्ये दारुबंदी

Webdunia
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (18:42 IST)
नितीशकुमार यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले पहिले आश्वासन पुर्ण करीत बिहारमध्ये नववर्षांत १ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. 
 
दारुनिषेध दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, १ एप्रिल २०१६पासून राज्यात दारूबंदी लागू करण्यात येणार असून, यासंदर्भात अधिकार्‍यांना आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत. राज्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येत आहे. दारूबंदी धोरण लागू केल्याने ४ हजार कोटी रुपयांचा महसूल कमी होणार असून, त्याच्या भरपाईसाठी वेगळ्या उपाययोजना केल्या जातील, असेही नितीशकुमार म्हणाले. दरम्यान, या निर्णयामुळे गुजरात, केरळ, मणिपूर व नागालॅण्डनंतर दारूबंदी लागू करणारे बिहार हे देशातील पाचवे राज्य ठरणार आहे.

पियुष गोयल, नितीन गडकरी मोदींच्या नवीन कॅबिनेट मध्ये महाराष्ट्रातून किती मंत्री? जाणून घ्या

नाशिक :रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना दोन मुलांना रेल्वेची धडक, दोघांचा मृत्यू

नांदेड मध्ये 2 तरुणांचा विहिरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू

मुंबईत बांधकामाधीन इमारतीचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई हवामान विभागाने घोषित केला अलर्ट, मूंबई-ठाणे सोबत या जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस

Show comments