Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पठाणकोटसारखे आणखी हल्ले : हाफिज

Webdunia
नवी दिल्ली- मुंबईवरील 26/11 च्या हल्लचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने भारताला पठाणकोटसारखे आणखी हल्ले झेलावे लागतील, अशी गरळ ओकली आहे.
 
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सभा घेऊन सईदने भारताविरोधात दहशतवादी कारवाया तीव्र करण्याची धमकी दिली. ‘आठ लाख भारतीय जवान काश्मीरमध्ये नरसंहार घडवत असताना आपल्या सुरक्षेसाठी त्यांना पठाणकोटसारखे हल्ले करण्याचा अधिकार नाही का?’, असा चिथावणीखोर सवाल सईदने केला. सईदने पठाणकोट हल्लची जबाबदारी घेणार्‍या सईद सलाउद्दीन या दहशतवाद्याचीही स्तुती केली. त्यावेळी भारताविरोधात जमावाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काश्मीरला स्वातंर्त्य मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार. आम्ही जिहादसाठी तयार आहोत, असे नारे जमावाने दिले. काश्मीरचे स्वातंर्त्य हे आमचे लक्ष्य आहे, असे सांगत सईदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही जमावाला भडकवले. 
 
काश्मिरींना काय हवे आहे हे ध्यानात घ्या. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात तर त्याची प्रतिक्रिया उमटणारच.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments