Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेंगलूरूनंतर अहमदाबादमध्येही बॉम्बस्फोट

तीस जणांचा मृत्यू, शंभराहून अधिक जखमी

वेबदुनिया
शनिवार, 26 जुलै 2008 (23:54 IST)
बंगलूरूमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्येही दहशतवाद्यांनी सलग सोळा स्फोट बॉम्बस्फोट घडवून आणले आहे. हल्ल्यात ती स व्यक्तींचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जखमी झाले आहेत.

मणिनगर, ईशानपूर, नारोळ सर्कल, बापूनगर, हटकेश्वर, सारंगपूर ब्रिज, सारकेज व आढाव या भागात कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले आहेत.

बेंगलूरूमध्ये काल (शुक्रवारी) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये साखळी स्फोट घडवून दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बेंगलूरू स्फोटात दोघांना बळी गेला होता.

जखमींपैकी काही गंभीर जखमी असून जखमींना जिल्ह्या रूग्णालय व एल जी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी आठ स्फोटास दुजोरा दिला आहे.

मात्र वृत्तवाहिनीनुसार आतापर्यंत सोळा स्फोट झाले आहेत. साकरेज भागात सीएनजी बसमध्ये स्फोट झाला. जयपूर बॉम्बस्फोटात (13 मे) सायकलवर स्फोटके लादून 65 घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाप्रमाणेच येथेही काही ठिकाणी सायकलवर स्फोटके लादून स्फोट घडवून आणले आहे. काही ठिकाणी टिफीनमध्यें स्फोटके ठेवण्यात आली होती.

सर्व स्फोट वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आले. बॉम्बस्फोटानंतर दूरध्नवी लाइन्स जाम करण्यात आल्या आहेत. यानंतर संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

बॉम्बस्फोटानंतर ई-मेल: शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याअगोदर इंडिया टीव्हीच्या कार्यालयात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा धमकीचा ई-मेल पाठवला होता.

मणिनगर हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. मोदींना याअगोदरही दहशतवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या.

पंतप्रधानांकडून बॉम्बस्फोटांचा निषे ध: पंतप्रधान मनमोहन सिंग व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बॉम्बस्फोटांचा निषेध केला असून नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान दिल्ली, जयपूर, हैदराबाद सारख्या महत्त्वपूर्ण शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments