Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचे पाकला प्रत्युत्तर: 2 पाक सैनिक ठार, 14 चौक्या उद्ध्वस्त

Webdunia
श्रीनगर/जम्मू- पाककडून झालेल्या गोळीबारात आठ भारतीय नागरिक मारले गेल्यानंतर पाकच्या या कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन पाक सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे. भारतीय जवानांनी केलेल्या तुफान गोळीबारात पाकच्या तब्बल 14 चौक्याही उद्ध्वस्त झाल्या आहेत.
 
गेले काही दिवस पाककडून सुरु असलेल्या गोळीबारात आठ निरपराध भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावालागला आहे, तर 22 नागरिक जखमी झाले आहेत. त्यानंतर पाककडून होत असलेल्या सततच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याचा संकल्प भारतीय सेनेने सोडला होता.
 
पाकिस्तान आर्मीने मंगळवारी पहाटे 5 वाजता नौशेरा सेक्टरमध्ये फायरिंग केली होती. येथील तीन नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर सकाळी 6.30 वाजता जम्मूच्या सांबा येथील रामगड सेक्टरमध्ये फायरिंग करण्यात आली. येथे 19 वर्षाची एक मुलगी आणि 2 मुलांचा फायरिंगमध्ये मृत्यू झाला. दोनजण जखमी झाले होते.
 
पाकिस्तान आर्मीच्या फायरिंगनंतर बीएसएफने प्रत्युत्तरात जारदार फायरिंग केली.
 
त्यानंतर आरएस पूरामधील अरनिया सेक्टरमधून फायरिंगचे वृत्त आले. येथे पाक आर्मीने 82 एमएम मोर्टर हल्ला केला. सीमेलगतच्या अनेक गावांना लक्ष्य केले गेले. येथे तीनजण जखमी झाले आहे. अरनिया येथे झालेल्या फायरिंगमधील जखमी नागरिकांवर उपचार सुरु आहे.
 
पाकिस्तान सीमेवर आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकने सीमेवरील सैन्याची संख्या वाढवली आहे. सैनिकांव्यतिरिक्त हेलिकॉप्टर आणि अंडर बॅरल ग्रेनेड लाँचरसह इतर मोठी शस्त्रास्त्रेसुद्धा सज्ज ठेवली आहेत.

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

पुढील लेख
Show comments