Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय इतिहासाचे संघाकडून नव्याने लिखाण

Webdunia
मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (12:14 IST)
राष्ट्रीय स्वंसेवक संघाच स्थापनेला 2025 ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या सोहळ्याची पूर्वतारी म्हणून संघाने सध्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.
 
यामधील ‘पुराणांतर्गत इतिहास’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुढील दहा वर्षात पौराणिक माहितीच्या आधारे संपूर्ण भारतीय इतिहास नव्याने लिहिण्याचा संघाचा संकल्प आहे. या योजनेंतर्गत देशातील 670 जिल्हे आणि तब्बल 600 समूहांचा इतिहास खुलासेवार मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय इतिहास संकलन आणि भारतीय पुराण अध्ययन संस्था या दोन संस्थांनी या कामात पुढाकार घेतला आहे. येत्या 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान गुजरातमधील पालमपूर येथे या संदर्भातील एक कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला अखिल भारतीय इतिहास संकलन संस्थेशी संबंधित देशाच्या विविध विद्यापीठांतील इतिहासाचे 100 प्राध्यापक हजेरी लावणार आहेत. या कामासाठी दिल्लीतील संघाच्या मुख्यालयातील आवारात भारतीय पुराण अध्ययन  संस्थानच्या कार्यालयाची स्थापनादेखील करण्यात आली आहे. पुराणग्रंथ हे भारतीय इतिहासाचा मुख्य दुवा आहे. 

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

Show comments