Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मृतदेहाची मालिकेमुळे ‘व्यापमं’चे गुढ वाढले

Webdunia
मंगळवार, 7 जुलै 2015 (11:02 IST)
मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या कथित घोटाळ्यातील सबंधितांचे मृतदेह सापडण्याची मालिका सुरु असल्याने या प्रकरणातील गुढ वाढत चालले आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
 
व्यापमंची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेली अनामिका सिकरवार (२५) हिचा मृतदेह आढळून आला.  ती सागर जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण अकादमीत वास्तव्याला होती. तिचा मृतदेह अकादमीलगतच्याच तलावात सापडला.
 
दरम्यान, मृतदेह सापडण्याच्या या मालिकेमुळे भाजपा सरकार अडचणीत आले असून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना हटविण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यपाल रामनरेश यादव यांना पदावरून हटवून चौकशीची मागणी करणारी याचिका विचारात घेण्याला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविल्याने भाजपा सरकारला चांगलाच झटका बसण्याची शक्यता आहे. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments