Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेमनला फाशीमुळे पाकला चांगला संदेश: संजय राऊत

Webdunia
गुरूवार, 30 जुलै 2015 (10:12 IST)
मुंबई- 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला आज फाशी देण्यात आल्याने पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध दिलेला हा एक चांगला संदेश असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
 
संजय राऊत म्हणाले, ‘‘याकूबच्या फाशीमुळे अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले सहन केले जाणार नाहीत, हे सिद्ध झाले आहे. याकूबने देशातील निरपराध नागरिकांचा बळी घेतला होता. त्यांनाही आज खर्‍या अर्थाने न्याय मिळाला. आपल्या देशातील काही जण अखेरपर्यंत याकूबला दया देण्यासाठी लढत होते. स्वतःला मान्यवर समजणार्‍या या नागरिकांना वाटते की आपल्या म्हणण्यानुसार देश चालतो. पण, तसे होत नाही. देश हा कायदा व सुव्यवस्था, जनभावनेनुसार चालतो. अशा नागरिकामुळे देशात कसाबसारखे दहशतवादी घुसतात आणि मेमनसारखे तयार होतात.‘‘

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

Show comments