Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणूनच चीनी सैन्याची भारतात घुसखोरी- राहुल गांधी

Webdunia
गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (11:16 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत असताना चीनी सैन्याकडून सीमेवर घुसखोरी सुरु होती, असा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी रायगडमधील महाड आणि लातुरमधील औसा येथील प्रचार सभेत संबोधित केले.
 
महाड येथील सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 
 
पृथ्वीराज चव्हाण हे कामे करणारे मुख्यमंत्री होते, ते मार्केटिंग करत नव्हते, मार्केटिंगपेक्षा त्यांनी कामांना अधिक महत्व दिले असे सांगून, राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची प्रशंसा केली. गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे, हे मोदी विसरले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गुजरात विकासाचे मोदींनी आभासी चित्र तयार केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. शेतकर्‍यांच्या फायद्याचा जमीन अधिग्रहण कायदा बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.  

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments