Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामपालच्या 'सतलोक' आश्रमात सापडले कंडोम आणि छुपे कॅमेरे

Webdunia
शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:27 IST)
स्वयंघोषित अध्यात्मिक संत रामपाल यांच्या 'प्रताप' थक्क करणारा आहे. तब्बल 36 तासांच्या संघर्षानंतर पोलिसांनी सतलोक आश्रमाचे बाबा रामपाल याला अटक केले. आता पोलिस आश्रमाच्या प्रत्येक कानाकोपर्‍याचा शोध घेत आहे. पोलिसांना बाबाच्या आश्रमात कंडोम आणि महिलांच्या शौच्छालयात छुपे कॅमेरे आढळून आले आहेत.

सतलोक आश्रमाच्या तपासात पोलिसांना कंडोम आणि महिला शौचालयात गुप्त कॅमेरे, आंमली पदार्थ, गुंगी आणणारा गॅस, अश्लील साहित्यासह अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. एका हत्येच्या प्रकरणात कोर्टात हजर न झाल्याने पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दाखल अवमानना याचिकेच्या सुनावणीलाही अनेकदा समन्स बजावून हजर राहाण्यास नकार देणारा बाबा रामपाल याच्या हिसार जिल्ह्यातील आश्रमाबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

सूत्रांचे म्हणणे आहे, की आश्रमात महिलांवर कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जात होती. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारील महिला शौचालयाबाहेरील कॅमेराचे लेन्स आतल्या बाजूला करण्यात आलेले होते. पोलिसांना शौचालयात कंडोम देखील सापडले आहेत. आश्रमात नायट्रोजन गॅसची दूर्गंधी होती. आरोग्य विभागाने हा गॅस धोकादायक असल्याचे सांगितले आहे, तर त्याचा वापर गुंगु आणण्यासाठी केला जातो असेही म्हटले आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून