Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विवाहबाह्य संबंधांतून झाली ज्योतीची हत्या...

Webdunia
बुधवार, 30 जुलै 2014 (17:52 IST)
कानपूरमधील एका बिस्किट कंपनीच्या मालकाच्या मुलाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. विवाहबाह्य संबंधातून हे हायप्रोफाइल हत्याकांड घडले आहे. पोलिसांनी बिस्किट व्यापारी पीयूष श्यामदेवानी याला  अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. पीयूष यानेच पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांना सुरवातीपासूनच संशय होता. 
 
सुरुवातीला आपली पत्नी ज्योती हीची दोन गुंडानी हत्या केल्याचे पीयूष याने पोलिसांना माहिती दिली होती. ज्योती आणि पीयूष रात्री डिनरसाठी गेले होते. घरी परत येत असताना ज्योतीचे दोन गुंडानी अपहरण केले होते. नंतर गुंडांनी तिची हत्या केल्याचे सांगून तिचा मृतदेह कारमध्ये आढळल्याचे पीयूषने पोलिसांना सांगितले होतहे. 
 
परंतु, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनाच धक्का बसेल अशा काही गोष्टी समोर आल्या. पोलिसांना या प्रकरणात अगोदरपासूनच पीयुषवर संशय होता. कसून चौकशी केल्यानंतर अवैध संबंधांमुळे पीयुषने आपल्या पत्नीच्या हत्येची कबुली दिली. यामध्ये पीयुषला त्याच्या ड्रायव्हरनेही मदत केल्याचे समोर आले आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयुषचे पत्नीशिवाय इतर अनेक मुलींशी अवैध संबंध होते. हत्येच्या दिवशी पीयूष आणि त्याची कथित गर्लफ्रेंडमध्ये जवळपास 150 मॅसेज एक्सचेंज झाले होते. जेव्हा पोलिसांनी पीयूष आणि त्याच्या गर्लफ्रेंडची समोरासमोर बसवून चौकशी केली तेव्हा अखेर पीयूषने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

Show comments