Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संघाकडून माझे आंदोलन हायजॅक : हार्दिक

Webdunia
शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (08:42 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून माझ्या आंदोलनाचे अपहरण केले जात असल्याचा आरोप गुजरातमधील पटेल समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांनी केला.
 
गुजरातमधील पटेल समाजास आरक्षण देण्याची मागणी मी आंदोलनामधून केल्यानंतर काहीच दिवसांत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील आरक्षणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात यावा, असे विधान केले. यामधून देशातील जातिनिहाय आरक्षण संपविण्यासाठी संघ अधीर झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आरक्षण काढून टाकण्यासंदर्भातील संघाच्या भूमिकेकडे कोणीही लक्ष देत नाही, असे लक्षात आल्यामुळे त्यांनी आता आमचे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. 
 
न्यायव्यवस्थेसहित इतर सर्व क्षेत्रांमध्ये ब्राह्मणांचे प्रभुत्व आहे. समाजाच्या खालच्या थरातील समुदायास ते व्होटबँक असल्याने याचा फायदा मिळतो. मात्र आमच्यासारख्या लोकांचे काय? संघाने हिंदू समाजास वेगवेगळ्या जातींमध्ये विभागून टाकले असून त्याचे खापर ते मुस्लिमांवर फोडत असतात, असा चौफेर हल्ला पटेल यांनी चढविला.
 

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

Show comments