Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनियांवरील वक्तव्यानंतर सिंग यांचे ‘लोटांगण’

Webdunia
गुरूवार, 2 एप्रिल 2015 (12:11 IST)
राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते आणि सोनिया गांधी जर गौरवर्णीय नसत्या तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते काय, असा सवाल उपस्थित करुन केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी नव्या वादास आमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे या वक्तव्याची दखल नायजेरियाच्या भारतातील राजदूताने आक्षेप घेतल्यामुळे अडचणीत आलेल्या सिंग यांनी माफी मागत सपशेल लोटांगण घातले.
 
या वक्तव्यावरून गिरीराज सिंग यांची वर्णभेदी मनोवृत्ती आणि महिलांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो, असा आरोप करुन देशातील विविध महिला संघटनांनी निषेध नोंदविला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीराज यांना तत्काळ मंत्रिमंडळातून हाकलावे व देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
 
दरम्यान, सहज केलेल्या टीकेमुळे आपण अडचणीत आलो असल्याचे लक्षात येताच सिंग यांनी जाहीर माफी मागितली. मात्र, त्यावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना आपल्याच मंत्र्याला सक्त ताकीद द्यावी लागली.
 

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

Show comments