Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्पाईस जेट विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लॅन्डींग!

वेबदुनिया
शनिवार, 3 सप्टेंबर 2011 (17:25 IST)
तांत्रिक बिघाड झाल्याने स्पाईस जेटच्या विमानाने आज (शनिवार) मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लॅन्डींग केले. हे विमान बंगळूरू येथून येत होते. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

मुंबई विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,""तांत्रिक बिघाड झाल्याने आज दुपारी स्पाईस जेटच्या विमानाने इमर्जन्सी लॅन्डींग केले. यावेळी विमानात 137 प्रवासी आणि इतर कर्मचारी होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कळविल्यावर विमानतळावर इमर्जन्सी लॅन्डींगची तयारी करण्यात आली होती. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. संबंधित घटनेवर स्पाईस जेट कंपनीच्या प्रवक्‍त्याने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.''

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments