Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘ईडी’चे नवीन आरोपपत्र, मिशेलचा समावेश

Webdunia
नवी दिल्ली- ‘ईडी’ने ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी करताना देण्यात आलेल्या लाचप्रकरणी नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे. ब्रिटनचा नागरिक आणि तथाकथित मध्स्थ ख्रिस्तियन मिशेल जेम्स आणि त्याच्या भारतातील काही साथीदारांचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. 
 
36 हजार कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर खरेदी व्वहारात भारतीय नेते आणि अधिकार्‍यांना 125 कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचे इटालिन न्यायालयात यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मनिलाँडरिंग प्रतिबंध काद्याच्या विशेष न्यायालयात ‘ईडी’ने तेराशे पानांची तक्रार चालू आठवडय़ात दाखल केली आहे. मिशेल याला 30 दशलक्ष युरो (225 कोटी रुपये) ऑगस्टा वेस्टलँडकडून मिळाले होते. बारा हेलिकॉप्टरचा व्ववहार पूर्ण करणसाठी ही रक्कम लाच देण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे.
 
न्यायालय लवकरच ‘ईडी’ने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेणची शक्यता आहे. गुइडो हेश्चे, कारलो गेरोसा या दोघांची ‘ईडी’ आणि सीबीआने यापूर्वीच चौकशी केलेली आहे. आता मिशेल याची चौकशी करण्यासाठी सीबीआयने इंटरपोलमार्फत रेडकॉर्नर नोटीस बजावली आहे. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments