Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'डॉ. देवयानी खोब्रागडेंवरील खटला अमेरिकेने मागे घ्यावा'

वेबदुनिया
WD
अमेरिकेमधील भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांच्यावरील खटला मागे घ्यावा, अशी मागणी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी अमेरिकेकडे केली आहे. तसेच याप्रकरणात नेमके काय घडले, याची तपशीलवार माहिती अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून मागविली असल्याचेही खुर्शीद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

डॉ. खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमधील पोलिसांनी अटकेची केल्याच्या घटनेचे भारतात तीव्र पडसाद उमटले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही सर्व पक्षांच्या सदस्यांनी याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच अमेरिकेने खंत व्यक्त केली असली तरी अमेरिकेने खोब्रागडेंची माफी मागून त्यांच्यावरील खटला मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे. या विषयाकडे संवेदनशीलपणेच बघितले पाहिजे, असेही खुर्शीद यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे, खोब्रागडे प्रकरणी संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कमलनाथ म्हणाले, अमेरिकेने चूक कबुल करून खोब्रागडे यांची माफी मागावी तसेच त्यांच्यावरील खटला मागे घ्यावा.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

Show comments