जम्मू-काश्मीरच्या शोपोरमध्ये रात्रीपासून चाललेल्या जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे.
काश्मीरचे पोलिस प्रमुख विजय कुमार म्हणाले की, दहशतवादी मुदासिर पंडितवर तीन पोलिस, दोन नगरसेवक आणि दोन नागरिकांचा बळी घेण्याचा आरोप आहे. याशिवाय त्याच्यावर सीमा संबंधित अनेक गुन्ह्यांचा देखील आरोप होता.
हल्ल्याला लष्कर-ए-तैयबा जबाबदार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 12 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवाद्यांपैकी मुदासीर पंडित हादेखील होता अशी माहिती विजय कुमार यांनी दिली.