पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंस्टाग्राम वर जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली इंटेलिजेंस ब्यूरो (आईबी) दल ने शुक्रवारी राजस्थानमधून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयबीने दहाना गावामधून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल आणि साकिर हत्यार विकण्याचे काम करून ऑनलाईन फसवणूक करतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी ने ज्या फोनवरून इंस्टाग्राम वर धमकीची पोस्ट टाकली त्या मोबाईलवरून डीग येथील पहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील डहाना गावात संपर्क साधण्यात आला होता, त्या आधारे इंटेलिजन्स ब्युरोच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार यामधील एका आरोपीने आपला मोबाईल संपूर्ण नष्ट केला. ज्यामुळे पोलिसांना आणि चौकशी यंत्रणांना तपास करायला समस्या येत आहे.