Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्ह्यामध्ये एक 40 वर्षीय व्यक्तीचा मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती मध काढण्यासाठी मधमाश्यांच्या पोळ्याजवळ होती. तेव्हा अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांना डंख मारल्यामुळे ही व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली. तसेच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गेल्या बुधवारी घडली असून एडिशनल एएसपी यांनी सांगितले की, मृत व्यक्ती फतेहपुरच्या मुजफ्फराबाद येथील रहिवासी आहे. तसेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.