Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (21:18 IST)
मुंबई, : मुंबई ते गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे 430 किमी अंतर सायकलने पूर्ण करणाऱ्या एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थी चमूला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी नुकतेच राजभवन येथे कौतुकाची थाप दिली.
 
तेरा सदस्यांच्या या सायकल अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल राज्यपालांनी दिव्यांग सायकलपटू मयूर दुमसिया यांचे अभिनंदन केले.
 
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, के. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्य तेजश्री शानभाग आणि सायकल अभियानात सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठाच्या ‘फिट भारत क्लब’ तर्फे ही मोहीम राबविण्यात आली असून ही मोहीम दरवर्षी राबविली जाईल, असे डॉ. बागला यांनी यावेळी सांगितले. या यशस्वी मोहिमेनंतर विद्यापीठातर्फे काश्मीर ते कन्याकुमारी हे सायकल अभियान राबविले जाईल असे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments