Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पश्चिम बंगालमधील बीरभूम मध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात साप आढळला

Webdunia
सोमवार, 9 जानेवारी 2023 (18:51 IST)
पश्चिम बंगाल मध्ये राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात साप आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विषारी अन्न खाल्याने 16 विद्यार्थी आजारी पडले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मयुरेश्वर येथे मांडलपूर प्राथमिक शाळेत भोजनात विषारी साप आढळल्याने विषारी अन्न खाऊन 16 विद्यार्थांना विषबाधा झाली आहे.  विद्यार्थ्यांना रामपूर हाट मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालकांनी शाळेत आंदोलन  केले.  
 
सोमवारी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जात होते. सुमारे 20 विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर अचानक शिजलेल्या वरणात मृत साप पडलेला दिसला. यानंतर मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांनी जेवण देणे बंद केले. 20 पैकी 16 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या होऊ लागल्या आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंदोलक पालक म्हणाले, “मांडलपूर प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी आणि शिक्षक दुर्लक्ष करतात. प्रत्येकजण बेफिकीरपणे स्वयंपाक करतो. आज शिजवलेल्या डाळीत साप दिसला.हे विषारी अन्न खाऊन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाची चौकशी केली जाण्याचे 
सांगण्यात आले आहे. या प्रकरणामुळे शाळेच्या व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

पुढील लेख
Show comments