Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

दिल्लीत भरधाव MCD ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली, एकाचा मृत्यू तर तरुणी जखमी

Accident
, मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (10:04 IST)
देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराचा बळी घेतला आहे. दक्षिण-पूर्व दिल्लीत सोमवारी दिल्ली महानगरपालिकेच्या ट्रकने एका मोटारसायकलला चिरडले. यामुळे एका 45वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पुल प्रल्हादपूर परिसरातील शिवमंदिर क्रॉसिंगजवळ एमसीडी ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याची माहिती मिळाली. तसेच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी दोघांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेले. जिथे डॉक्टरांनी 45 वर्षीय व्यक्तीला मृत घोषित केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजमेरमध्ये रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर 70 किलोचे 2 सिमेंट ब्लॉक ठेवले