Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

16 मजुरांना घेऊन जाणारा ट्रक उलटून आठ जणांचा जागीच मृत्यू

Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (10:51 IST)
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे 16 मजुरांना जम्मू-काश्मीरला घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काहीजण तेथे जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ट्रक सिलीगुडीहून जम्मू-काश्मीरला जात होता, असे सांगण्यात येत आहे. पूर्णियाच्या जलालगडमध्ये ते नियंत्रणाबाहेर गेले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले.  
 
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेह घटनास्थळावरून काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले जात आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रकमध्ये लोखंडी पाईप होते. ट्रक अनियंत्रित होऊन  पलटी झाल्याने मजूर या पाईपखाली दबले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.
 
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ट्रकचा वेग खूप होता. त्यामुळे ट्रकवरील तोल जाऊन तो अपघाताचा बळी ठरला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments