भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना उद्या साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाला वीरचक्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चानंतर आता केंद्र सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे.
एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांची काही काळाने सुटका झाली होती. बालाकोट एअर स्ट्राइकचे नायक अभिनंदन यांचा वीर चक्राने सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय वायू दलातील वरिष्ठ अधिकारी (स्वाडूट लिडर) मिंटी अग्रवाल यांनाही युद्ध सेवा मेडल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 15 ऑगस्टच्या स्वात्रत्र्यदिनी वीरचक्र पुरस्कार देऊन अभिनंदन वर्धमान यांचा गौरव होईल. अभिनंदन यांच्यासह ज्या वैमानिकांनी दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत केले आहे. त्या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा हवाई दलाच्या सन्मान चिन्हाने सत्कार करण्यात येणार आहे.