Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिमुकल्याला गाडीने फरफटत नेलं

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (16:37 IST)
Accident In Mahoba:उत्तर प्रदेशातील महोबा येथे शनिवारी एक वेदनादायक रस्ता अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाने स्कूटीवर बसलेल्या आजोबा आणि नातवाला उडवले. अपघातानंतर ट्रक चालकाने नातवाला 2 किलोमीटरपर्यंत ओढून नेले.
 
महोबा येथील कानपूर-सागर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अपघातानंतर 6 वर्षीय मासूम ट्रकमध्ये अडकला होता. त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असताना निष्काळजी ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकाने ट्रकखाली स्कूटीमध्ये अडकलेल्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाला 2 किलोमीटर अंतरापर्यंत नेले.
 
आजोबा -नातू बाजारात जात होते
जाणाऱ्यांनी थांबवूनही ट्रक चालक थांबला नसल्याचा आरोप आहे. या अपघातात आजोबा आणि नातू दोघांचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सदर कोतवाली भागातील कानपूर सागर राष्ट्रीय महामार्गावर उदित नारायण आपल्या नातवासोबत बाजारात जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात उदित नारायण यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा 6 वर्षांचा नातू ट्रकमध्ये अडकला होता.

संबंधित माहिती

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

पुढील लेख
Show comments