Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजोरी-पुंछ महामार्गावर लष्कराच्या वाहनाचा दरीत कोसळून अपघात एका जवानाचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (12:13 IST)
राजोरी-पुंछ महामार्गावरील मांजकोट पोलीस ठाण्यांतर्गत पत्राडा गावातील मिर्झा मोड येथे मंगळवारी संध्याकाळी लष्करी वाहनाला अपघात झाला. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला, तर तीन जवान जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन पूंछ जिल्ह्यातील बीजी भागातून मांजाकोटच्या दिशेने जात असताना एका अंध वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन नदीकाठावरील 400 फूट खोल दरीत कोसळले. गाडीतून प्रवास करणारे चार जवान जखमी झाले. बुलेट प्रूफ वाहनात पॅरा युनिटच्या दोन जवानांचा समावेश होता.
 
हा अपघात इतका भीषण होता की, लष्करी वाहनाचा चक्काचूर झाला. त्यात प्रवास करणारे सैनिक गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना मांजकोट येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून प्राथमिक उपचारानंतर सर्वांना जीएमसी राजौरी येथे रेफर करण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, मांजकोटहून राजोरीला जाताना एका सैनिकाचा मृत्यू झाला आणि इतर तीन जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पॅराकमांडो विमल सिंग असे शहीद जवानाचे नाव आहे.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments