भारतीय नागरिक हमीद निहाल अन्सारी (३३) तब्बल ६ वर्षानंतर भारतात परतला. त्यानंतर अन्सारी आणि त्याच्या परिवाराने बुधवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. सुषमा स्वराज यांना भेटताच अन्सारीला रडू कोसळले. त्याने भारताचे आणि सुषमा स्वराज यांचे आभार मानले. पाकिस्तानमधून सोडण्यात आल्यानंतर अटारी- वाघा सीमेवर पाकिस्तानी लष्कराने त्याला भारतीय लष्कराकडे सोपविले होते.
मुंबईच्या हमीदची ऑनलाईनच्या माध्यमातून एका पाकिस्तानी मुली बरोबर मैत्री झाली होती. तिला भेटण्यासाठी त्याने अफगानिस्तानमधून पाकिस्तानमध्ये अवैध रित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी २०१२ला मध्ये पाकिस्तानी लष्कराने हमीदला अटक केली होती.