Dharma Sangrah

भाजपचे ‘मिशन 350 प्लस’

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (09:05 IST)

आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची  तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भाजपनं ‘मिशन 350 प्लस’ निश्चित केलं आहे.
 

देशातील 150 अशा जागा आहेत, जिथे भाजपचा पराभव झाला होता. तिथे विजयासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत, असं अमित शाह यांनी बैठकीत सांगितलं. या जागा निवडून आणण्यासाठी त्यावर पुढील दोन वर्षे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांविषयी मंत्र्यांकडून माहिती मागवली.  अमित शाह यांनी बैठकीला उपस्थित असणाऱ्या 9 केंद्रीय मंत्री आणि 30 पक्ष पदाधिकाऱ्यांना आतापासूनच कामाला लागण्यास सांगितले आहे. यावेळी अमित शाह यांनी 10 मिनिटांचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही सादर केलं. यामध्ये बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांचा विशेष उल्लेख केला गेला आहे.

 
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments