Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Another blow to Sharad Pawar group शरद पवार गटाला आणखी एक धक्का

Webdunia
गुरूवार, 20 जुलै 2023 (20:56 IST)
Another blow to Sharad Pawar group राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षातील आमदारांसह बंड घडवून आणले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना तीसहून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता अजित पवार यांचं बळ वाढविणारे वृत्त समोर आले आहे. शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं की, संपूर्ण प्रदेश कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत बनवायचं निश्चित केलं.
 
नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी आज दिल्लीत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला. शिवाय सात आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचं शपथपत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवले आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर  केल्यामुळे अजित पवारांची बाजू  आणखी भक्कम झाल्याचे दिसून येत आहे.
 
दरम्यान शरद पवारांनी अद्यापही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे असतानाच आता नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments