Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तौक्ते चक्री वादळानंतर एक अजून चक्रीय वादळाचा धोका, 27 मे रोजी हे चक्रीय वादळ पूर्व तटेवर धडकण्याची भीती

तौक्ते चक्री वादळानंतर एक अजून चक्रीय वादळाचा धोका, 27 मे रोजी हे चक्रीय वादळ पूर्व तटेवर धडकण्याची भीती
, बुधवार, 19 मे 2021 (18:55 IST)
नवी दिल्ली. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे आणि 27 मे रोजी त्याची पूर्वेकडील किनाऱ्यावर धडक बसण्याची शक्यता आहे.
मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन म्हणाले की, 23 मे रोजी बंगालच्या उपसागरात चक्रियवादळाचे अभिसरण बनण्याची शक्यता वर्तली जात आहे. ते म्हणाले की, ते चक्रीवादळ बनून पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यापट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, हे चक्रीवादळ तौक्ते चक्रीवादळा इतके तीव्र होणार नाही, ज्याने अत्यंत भयावह तीव्र चक्रीवादळाचे रूप दाखविले होते.
एप्रिल-मे महिन्यात पावसाळ्याच्या अगोदरच्या काही महिन्या पूर्वी पूर्वेच्या आणि पश्चिम किनाऱ्यापट्टीवर चक्रीवादळ बनतात . मे 2020 मध्ये मोठे  चक्रीवादळ एम्फन ' आणि पश्चिम किनारपट्टीवर 'निसर्ग  या तीव्र चक्रीवादळं पूर्व किनाऱ्यापट्टीवर आदळले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनातून बरे झाल्यानंतर लस कधी घ्यावी? केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर