पोलिसांच्या माहितीप्रमाणे माजी सीएम एनडी तिवारी यांच्या मुलगा रोहित शेखर तिवारी यांची हत्या त्यांच्या पत्नीने गळा घोटून केली. याने कानातून वर जाणार्या नसा फाटल्या आणि त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले होते. हे मेडिकल बोर्डाच्या विस्तृत पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कळून आले. पत्नी अपूर्वाने कशा प्रकारे पुरावे नष्ट केले जाणून घ्या...
पोलिसांप्रमाणे अपूर्वाने खोलीतील रक्त स्वच्छ केले. खोलीत रक्ताने माखलेले टिशू पेपर जप्त केले गेले होते. या टिशू पेपर्सने अपूर्वाने रोहीतच रक्त स्वच्छ केलं होतं.
आधी तर अपूर्वा स्वत: दोषी नसल्याचे सांगत होती. वारंवार आपले वक्तव्य बदलत पोलिसांना परेशान करत होती परंतू सक्तीने चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी अपूर्वाला वैज्ञानिक तपासणी आणि एफएसएलच्या रिपोर्टच्या आधारावर अटक केली आहे.
पोलिसांप्रमाणे वैवाहिक जीवनात ताण, संपत्ती आणि राजकारणात करिअरची महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे अशा अनेक मुद्द्यांमुळे अपूर्वाने आपल्या पतीचा खून केल्याचे समोर आले आहेत. अपूर्वा रोहित यांच्या नात्यात असलेल्या एक महिलेला पसंत नव्हती करत आणि घटना घडली त्या दिवशी रोहित आणि त्या महिलेने सोबत दारूचे सेवन केल्यावर नवरा-बायकोचे आपसात भांडण झाले. या दरम्यान रागात अपूर्वाने गळा घोटून पतीचा खून केला.
अपूर्वा मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची अध्यक्षा होती. तिच्या राजकारणात करिअर करायचे होते परंतू लग्नानंतर तिला काही सकारात्मक परिणाम दिसत नव्हते. मे 2018 मध्ये त्यांचा विवाह झाला परंतू 14-15 दिवसातच ती घरापासून लांब राहू लागली होती. कधी माहेरी तर कधी दक्षिण दिल्ली भाड्याच्या घरात राहायची.