Dharma Sangrah

मोदीच्या आई आणि पत्नीबद्दल काय बोलले केजरीवाल...

Webdunia
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईला भेटल्याबद्दल केलेल्या ट्विटवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिप्पणी करत म्हटले की हे सर्व राजकारण आहे.
 
मोदी दोन दिवसीय गुजरात प्रवासावर आहे. त्यांनी आज ट्विट करत म्हटले की आज मी आईला भेटायचे म्हणून योग केले नाही. सकाळी आधी मी आईसोबत नाश्ता केला आणि तिच्यासोबत वेळ घालवून खूप छान वाटले.
मोदींच्या या ट्विटची आलोचना करत केजरीवालने त्यांच्यावर राजकारण करण्याचा आरोप केला. केजरीवालने लिहिले की मोदींना मन मोठे करून आपल्या आई आणि बायकोला स्वत:जवळ ठेवायला हवे. केजरीवालने अजून एका ट्विटमध्ये लिहिले की मी आपल्या आईजवळ राहतो आणि रोज तिचा आशीर्वाद घेतो पण सगळीकडे याबद्दल गाजवून सांगत नाही. मी आपल्या आईला राजकारणासाठी बँकेच्या रांगेतही उभे करत नाही.
 
उल्लेखनीय आहे की मोदींची वयस्कर आई नोटबंदी दरम्यान गांधी नगर स्थित एका बँकेतून रुपये काढण्यासाठी व्हील चेअरने पोहचली होती. तेव्हा विपक्षाने या घटनेची निंदा केली होती.
 
केजरीवालने एक आणखी ट्विटमध्ये लिहिले की हिंदू धर्मानुसार त्यांना आपल्या आई आणि धर्मपत्नीला आपल्यासोबत ठेवायला पाहिजे. पंतप्रधान आवास खूप मोठं आहे, थोडं मनही मोठं करावं.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments