Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आझम खान विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Webdunia
भारतीय सैन्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिजनौर येथील चांदपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आझम खान यांच्या या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी व संघटनांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
 
आझम खान यांच्याविरोधात भारतीय दंडविधान नुसार कलम १२४ अ (राजद्रोह), १३१ (दंगल घडवण्यासाठी प्रोत्साहन देणे किंवा कर्तव्यावर असलेल्या सैनिकाला विचलित करण्याचा प्रयत्न करणे) आणि कलम ५०५ (आपल्या वक्तव्याने शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणे) या अंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री अनिल पांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. या कलमाअंतर्गंत आझम खान यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. कलम १२४ अ आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांना विचलित करण्याच्या कलम १३१ या दोन्हीमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments