Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी आजपासून सुनावणी

Webdunia
गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (09:45 IST)

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावरील विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणीला सुरुवात होत आहे. मुस्लिम संघटनांच्यावतीने कपिल सिब्बल आणि तीन वकिलांनी याप्रकरणी संविधानिक खंडपीठाची मागणी करत २०१९ च्या निवडणुकीनंतर सुनावणी करण्याची मागणी केली होती. मात्र, दीपक मिश्रा यांच्या विशेष खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत या प्रकरणावरील सुनावणी टाळता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आयोध्या प्रकरणी रामजन्मभूमी ट्रस्ट, रामलल्ला यांच्यावतीने जेष्ठ वकील हरीश साळवे आणि सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर बाजू मांडली होती.   याप्रकरणातील सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे यावर लवकरात लवकर सुनावणी व्हायला हवी, असे मत उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडले होते.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments