rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बधाई हो' ला नोटीस

badhai ho
, मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (09:21 IST)
दिल्ली सरकारच्‍या राज्य तंबाखू नियंत्रण सेलने  'बधाई हो' चित्रपटात तंबाखूच्‍या सेवनाचे सीन दाखवल्‍याने या चित्रपटाचे निर्माते, दिग्‍दर्शक आणि कलाकारांना नोटीस पाठवली आहे. सेलने नोटीसमध्‍ये निर्माते आणि दिग्‍दर्शकाला चित्रपटातून धूम्रपानचे सीन्‍स हटवण्‍याचे निर्देश दिले आहेत. चित्रपटातून हे सीन न हटवल्‍यास सेलने कोटपा (सिगरेट ॲण्‍ड ऑदर टोबॅको प्रोडक्ट ॲक्ट) कायद्‍याअंतर्गत कारवाई करण्‍याचा इशारा दिला आहे. 
 
नोटीसमध्‍ये सेलचे प्रभारी अतिरिक्त संचालक डॉ. एसके अरोडा म्‍हणाले, 'बॉलिवूडच्‍या अनेक चित्रपटांमध्‍ये कोटपा कायद्‍याचे उल्लंघन केले जाते. चित्रपटामध्‍ये अनेक वेळा कलाकार सिगरेट ओढताना दाखवले जाते. शिवाय, या चित्रपटात सिगरेटच्‍या दुकानाचे एक दृश्य देखील आहे. जेथे कलाकार एकत्र येतात आणि धूम्रपान करतात. या दृश्यामुळे चित्रपटात परदेशी ब्रँडच्‍या सिगरेटचा प्रचार व प्रसार करण्‍याचा आरोप नोटिसमध्‍ये करण्‍यात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुत्र्यांचं रक्तदान शिबीर संपन्न