Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

OMG चिमुकल्याला दूध पिण्याच्या वयात बिअर पाजली !

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2024 (12:30 IST)
उत्तर प्रदेशातील शाहजहापुर येथून एका हैराण करणारा व्हिडिओ समोर येत आहे. यात एक माणूस बाळाला घेऊन दारु पिण्यासाठी ठेक्यावर पोहचला. दरम्यान तेथे उपस्थित लोकांनी बघितले की तो मुलाला बीअर पाजत आहे भडकून आणि त्या व्यक्तीला जोरदार फटकारले. लोकांनी पोलिसांनाही फोन केला पण तोपर्यंत तो फरार झाला होता.
 
सदर बझार कोतवाली परिसरात असलेल्या मॉडेल शॉप कँटिनचे हे प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एक व्यक्ती एका अर्भकाच्या मांडीवर घेऊन दारू पिण्यासाठी आला होता. काही वेळाने त्याने तान्ह्या मुलालाही बिअर द्यायला सुरुवात केली. तो मुलाला बिअर देत असल्याचे तेथे उपस्थित लोकांनी पाहिल्यानंतर सर्वांनी त्याला विरोध केला. कुणीतरी पोलिसांना फोनही केला पण पोलीस पोहोचेपर्यंत तो माणूस मुलासह पळून गेला होता.
 
 
सदर बझार पोलिस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments