Festival Posters

बंगलोर छेडछाड प्रकरणाचे लज्जास्पद व्हिडिओ

Webdunia
न्यू इयर उत्सव दरम्यान बंगलोर येथे महिलांसोबत झालेल्या छेडछाडच्या घटनेमुळे पोलिस आणि प्रशासनावर बोट उचलले जात आहे. देशभरातून यावर तीक्ष्ण प्रतिक्रिया येत असताना अजूनही काही तथ्य समोर येत आहे. 31 तारखेच्या रात्री घराहून बाहेर असलेल्या महिला सुरक्षित नव्हत्या.
हा व्हिडिओ बघितल्यावर आपण विचार करू शकता की त्या दिवशी शहरात काय सुरू होतं ते. यात एक मुलगी ऑटोतून उतरून काही पाऊल चालत आपल्या घराकडे जात असताना दोन मुलं मागून येतात आणि पुढे येऊन थांबतात. त्यांना बघून मुलगी घाईघाईने चालण्याचा प्रयत्न करते परंतू गाडीवरून एक मुलगा उतरून तिच्यासमोर येऊन उभा राहतो.
 
तो मुलगा तिच्यासोबत छेडखानी करतो आणि यात त्याचा साथीही त्याला साथ देतो. नंतर तो मुलीला रस्त्यावर पटकून दोघेही तिथून निघून जातात. ही घटना रात्री 2.30 मिनिटावर घडली होती. हे पूर्ण प्रकरण एका घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कॅप्चर झाली. घराच्या मालकाने हे फुटेज बघून पोलिसांना आणि मीडियाला याबद्दल माहिती दिली.
 
यात लज्जास्पद म्हणजे तिथे थोड्याच लांबीवर उभे लोकं मुलीच्या मदतीला पुढे आले नाही. बंगलोर सारख्या कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणून ओळख असलेल्या शहरात अशी घटना लज्जास्पद आहे.
 
उल्लेखनीय आहे की 31 डिसेंबरला शहरातील काही प्रमुख शहरांमध्ये गर्दीचा फायदा घेत अनेक मुली आणि महिलांसोबत छेडखानी झाली होती. अश्या असामाजिक तत्त्वांना शिक्षा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments