Publish Date: Fri, 06 Oct 2023 (17:49 IST)
Updated Date: Fri, 06 Oct 2023 (17:54 IST)
Bihar :बिहारच्या गया जिल्ह्यात सलैया गावात एका प्रेमी जोडप्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या जोडप्याचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ते दोघे गावात लपूनछपून भेटायचे त्यांनी लग्न करण्याचा विचार केला आणि गावातल्या बलियारी देवीच्या मंदिरात लग्न करण्याच्या निर्णय घेतला.ही बातमी गावकऱ्यांना समजल्यावर गावकरी संतापले आणि त्यांनी दोघांना मंदिरात पकडले आणि त्यांच्या सोबत गैरवर्तन केले.
त्यांना मारहाण केली आणि त्यांचे केस कापून त्यांचे कपडे काढून त्यांना गावातून बाहेर हाकलले. तर मुलीला देखील मारहाण केली आणि पुन्हा गावात न येण्याची धमकी दिली. मुलीच्या वडिलांना देखील गावातून बाहेर काढण्यात आले.
या घटनांनंतर या प्रेमी युगुलांनी या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गावकर्यांबद्दल तक्रार केली आहे. आणि सुरक्षेची मागणी केली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.