Dharma Sangrah

भाजपला ४ हजार गावातील लोकांनी केली संचारबंदी

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2017 (14:53 IST)
गुजरात येथील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपला जवळपास ४ हजार गावांनी संचारबंदी केली आहे. या सर्व गावांवर पाटीदार समाजाचे वर्चस्व आहे.  भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक गावातील लोकांनी अनेक ठिकाणी लावले आहेत. आदिवासी पट्ट्यातील चाकमांडला या दुर्गम गावात धरणामुळे विस्थापित होणा-या ग्रामस्थांमध्ये सोबत  उंबरगाव तालुक्यातील नारगोळमध्ये बंदर उभारण्यास मच्छीमारांचा तीव्र विरोध असल्याचे समोर आले आहे. .
 आदिवासीबहुल चाकमांडला गावात मतदारसंघावर वर्षानुवर्षे काँग्रेसचे वर्चस्व आहे.  या भागातून भाजपाचे रमण पाटकर उमेदवार आहेत मात्र या तीव्र विरोधाने ते त्रस्त झाले आहेत. 

मेहसाणा, राजकोट, सूरत व नवसारी येथील ४ हजार गावांमध्ये  भाजपा प्रवेश नको असे फलक लागले आहेत. तर दुसरीकडे  पाटीदार समाजाच्या या विरोधाची चर्चा सर्वत्र दिसून येतेय  वलसाड, सूरतसारख्या शहरी भागांतील नाराज मतदारांनी वॉर्डांमध्ये आणि सोसायट्यांमध्येही भाजपासह सर्वच पक्षांना बंदी लागू केली आहे. तलाठी घोटाळा झाला आणि पाटीदार सामाजाच्या विरोधाला सुरुवात झाली होती. तलाठ्यांची भरती उच्च न्यायालयाने रद्द केली. तेथेच पाटीदारांच्या आंदोलनाची सुरुवात झाली होती.  आदिवासीबहुल भागातील बोपी, वास्ता, धरमपूर व चाकमांडला गावे महाराष्ट्राच्या सीमेलगत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments