Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप आमदार ट्रेनसमोर रुळावर पडल्या, व्हिडिओ व्हायरल

Webdunia
मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (12:47 IST)
असं म्हणतात की निष्काळजीपणामुळे अपघात होऊ शकतो किंवा कधी कधी अतिउत्साह एखाद्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. इटावा येथे वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत पुढे जाण्याच्या भाजप कार्यकर्त्यांच्या स्पर्धेमुळे आमदार ट्रेनसमोर रुळावर पडल्या. वंदे भारत ट्रेनची शिटी वाजली होती, त्यानंतर तिथे उपस्थित कामगारांनी पायलटला ट्रेन थांबवण्याचा इशारा दिला, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.
 
आग्रा-बनारस वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला उद्घाटनाच्या वेळी हिरवा झेंडा दाखवला जात असताना गोंधळ उडाला. दरम्यान, भाजपच्या इटावा आमदार सरिता भदौरिया याही स्टेशनवर पोहोचल्या. ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत असताना आमदार मागून पुढे आल्या अचानक त्यांना धक्का लागला आणि त्यांचा तोल गेला, त्या रेल्वे रुळावर पडल्या. त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या लोकांनी रुळावर उड्या मारून त्यांना पटकन उचलले, तर इटावा येथील भाजपचे माजी खासदार राम शंकर कथेरिया यांच्यासह कार्यकर्त्यांनी वंदे भारतला पुढे जाण्यापासून रोखले, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता.

रेल्वेने फलाटावर दिला हॉर्न : भाजपचे आमदार फलाटावरून खाली रेल्वे रुळावर पडताच घबराट निर्माण झाली, कारण ट्रेनचा हॉर्न आधीच वाजला होता, नेत्यांनी हिरवा सिग्नल देताच रेल्वे वेग पकडा आणि त्याच्या गंतव्याकडे जाणार मात्र तिथे उपस्थित नेत्यांच्या शहाणपणामुळे लोको पायलटच्या मदतीने ट्रेन थांबवण्यात आली. आमदारांना फलाटावर नेऊन वंदन भारत एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला श्रीफळ फोडून गाडीला  इच्छित स्थळी रवाना करण्यात आले. आमदार सरिता भदौरिया फलाटावरून रेल्वे रुळावर पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments