दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणा युद्ध रंगले होते. यावेळी भाजपाकडून मोदी-मोदी तर, शिवसेनेकडून ‘चोर है-चोर है’ या घोषणा दिल्या होत्या. त्याच मुद्यावरुन टीका केली आहे.